राज्यासाठी दिलासा, मात्र मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर

COVID - 19 Maharashtra

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) एकेकाळी करोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून यामध्ये सातत्यानं घट होताना दिसत आहे. राज्यात करोना संसर्गाची स्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. आज १३ हजार ३९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असताना १५ हजार ५७५ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेटही त्यामुळे वाढून ८१.१३ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, राज्यातील स्थिती सुधारत असताना मुंबईत अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील करोना साथीचा विळखा काहीसा सैल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील करोनाचे आकडे दिलासा देणारे ठरत आहेत. आज राज्यात १५ हजार ५७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आजपर्यंत १ लाख २३ हजार ६९४ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोनातून रुग्ण बरे होण्याचा दरही आता ८१.१३ टक्क्यांवर पोहोचला असून हे चांगले संकेत मानले जात आहेत.

राज्यात आज १३ हजार ३९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४ लाख ४ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ९३ हजार ८८४ (२०.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २२ लाख ८४ हजार २०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ३२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ३५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईत सर्वाधिक ४८ मृत्यू झाले तर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ३०, पुणे पालिका हद्दीत २७ व नागपूर पालिका हद्दीत २६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत करोनाने ३९ हजार ४३० जणांचा बळी घेतला असून करोना मृत्यूदर सध्या २.६४ टक्के इतका आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER