कोरोनाबाबत दिलासा : राज्यातील रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ९५.२५

Maharashtra Coronavirus Recovery Rate

मुंबई : राज्यातील करोनाच्या साथीबाबत दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ३, ०८० रुग्ण बरे झालेत. रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२५ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १५ हजार ३४४ रुग्ण बरे झाले आहेत.

आज दिवसभरात राज्यात नवे १८४२ रुग्ण आढळले असून, ३० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २० लाख १० हजार ९४८ वर पोहचली आहे. राज्यात ४३ हजार ५६१ सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत ५० हजार ८१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकाच दिवसात आढळलेत ९८ रुग्ण

पुणे शहरात आज दिवसभरात ९८ रुग्ण आढळलेत. रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८४ हजार ७८० झाली. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ४, ७३९ झाली. १२३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत १ लाख ७८ हजार ०१६ रुग्ण बरे झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER