रिलायन्स देणार आता ‘क्लाऊड’ सेवा

- मायक्रोसॉफ्टशी सहकार्य करार

jio

मुंबई : एकीकडे जिओच्या मार्फत रिलायन्सने डिजिटल व मोबाइल क्षेत्रात क्रांती आणण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी रिलायन्स आता स्वत:ची ‘क्लाऊड’ सेवा देण्यासाठीही सज्ज झाले आहे.

मायक्रोसॉफ्ट सहकार्याने रिलायन्स समूह ‘क्लाऊड’ सेवा पुरविणार आहे. ‘अझुरे’ नावाच्या या सेवेसाठीची यंत्रणा महाराष्ट्र व गुजरातमध्ये उभी होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.

नवउद्यमींसाठी अधिकतर पसंतीचे मानले जाणाऱ्या क्लाऊडवर आधारित इंटरनेट सेवेकरिता रिलायन्सने मायक्रोसॉफ्टसह भागीदारी जाहीर केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी मोठे डेटा सेंटर सुरू करण्याची घोषणाही केली.

ही बातमी पण वाचा : शेअर बाजार गडगडला ६२३ अंक

१ जानेवारी २०२० पासून ‘रिलायन्सडॉटकॉम’ या वेबसाइटवर नवउद्यमींना नोंदणी करता येणार आहे. जागतिक स्तरावर या क्लाऊड सेवेकरिता मासिक १ हजार डॉलर आकारले जात असताना आणि भारतातील मासिक २० हजार ००० रुपयांपर्यंतच्या दरांच्या तुलनेत रिलायन्स-मायक्रोसॉफ्टची सेवा १,५०० रुपयांना असेल. भारतातील ८० टक्के छोटे, नवे व्यावसायिक क्लाऊड आधारित इंटरनेट सेवेचा अंगिकार करतात. त्यांना याचा फायदा मिळेल.