रिलायन्स उभारणार महाराष्ट्रातली अद्यावत ‘स्मार्ट सिटी’

anil-ambani

मुंबई :- रिलायन्स कम्युनिकेशन अद्यावत सोयीसुविधा असणारी वसाहत नवी मुंबई येथे लवकरच उभारणार आहे. ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्मार्ट सिटी वसाहत असेल. राज्य सरकार आणि एमआयडीसीने धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीला मंजुरी दिल्याचे कंपनीने सांगितले. नव्याने तयार होत असलेला हा प्रकल्प १३२ एकरमध्ये बांधण्यात येणार आहे ज्यात ३ लाख चौरस फूट जागा व्यावसायिक हेतूसाठी निर्माण करण्यात येणार आहे. विक्रीसाठी किंवा लिझ तत्वावर व्यावसायिक इमारती उपलब्ध करून देणार असल्याचेही कंपनीने सांगितले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पेक्षा याचे मार्केट मोठे असेल असेही कंपनीने नमूद केले.

ही बातमी पण वाचा : रिलायन्स जिओचा सरकारी बीएसएनएललाही फटका