रिलायन्स करते रोज एक हजार टन ऑक्सिजनचे उत्पादन!

Reliance produces 1000 tons of oxygen daily - Maharashtra Today

मुंबई :- सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. ऑक्सिजन, औषधांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे. सरकारव्यतिरिक्त इतर संस्था ऑक्सिजनचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं दररोज सुमारे एक हजार टन मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन सुरू केलं आहे.

रिलायन्सने वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन ० ते १ हजार टनपर्यंत वाढवले आहे. जे देशातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनाच्या ११ टक्के आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. मुकेश अंबानी स्वत: गुजरातच्या जामनगरमधील कंपनीच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत.

एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याला माझे आणि संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्राधान्य आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले. “भारताला सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसतो आहे. अशा परिस्थितीत मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून उत्तम पुरवठा व्यवस्था स्थापन करायला हवी. ” असे ते म्हणाले.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात कंपनीने १५ हजार टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. याशिवाय कंपनीने सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जिअम, नेदरलँड्स आणि थायलंडमधून ५०० टन ऑक्सिजन कंटेनरदेखील एअरलिफ्ट केले आहेत. त्यामुळे पुरवठ्यातही वाढ झाली आहे.

ही बातमी पण वाचा : ऑक्सिजन, रेमडेसिविर फक्त ‘पॉवरफुल मंत्र्यांच्या’ जिल्ह्यातच जाते, फडणवीसांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button