देवेंद्र फडणवीस सरकारला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून सत्तापेचाची सुनावणी उद्यावर

Supreme-Court-Ajit-Pawar-Devendra-Fadnavis

नवी दिल्ली : राज्यातील सरकार स्थापनेचा पेच उद्यावर गेला आहे. सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला निमंत्रण देण्याचा निर्णय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घेतला. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उद्या (२५ नोव्हेंबर) सकाळी १०: ३० वाजतापर्यंत सादर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिला आहे. सरकारच्यावतीनं बाजू मांडतांना तुषार मेहता यांनी “न्यायालयानं आदेश दिल्यास राज्यपालांनी जो निर्णय घेतला, त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करू,” असं सांगितलं होतं.

त्यामुळे सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सगळ्या पक्षकारांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी २८८ आमदारांपैकी बहुमताचा आकडा आमच्या तीन पक्षाकडे आहे. २२ नोव्हेंबरच्या रात्री तीन पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत होती असा घटनाक्रम त्यांनी कोर्टात सांगितला. तर राष्ट्रपती राजवट ५.४७ मिनिटांनी हटविण्यात आलं. कॅबिनेटच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपती राजवट कशी हटविण्यात आली? असा प्रश्न त्यांनी कोर्टात केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राष्ट्रपतींच्या भेटीला

तर इतक्या रात्री राज्यपालांना बहुमताची खात्री कशी पटली? कमी वेळात राज्यपालांनी हा निर्णय कसा घेतला? राज्यपालांनी जे निर्णय घेतले ते दुर्दैवी आहेत. जर भाजपाकडे बहुमत असेल तर आजच सिद्ध करावं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला. देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना किती वाजता पत्र दिलं? इतक्या तातडीने घडामोडी कशा घडल्या? असं प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी राज्यपालांना बहुमताची खात्री पटली असेल तर ते निमंत्रण देऊ शकतात असं न्यायाधीशांनी सांगितले.