यशराजच्या ‘बंटी और बबली २’चे रिलीजही पुढे ढकलले, ‘राधे’च्या रिलीजवरही संकट?

Bunty Babli 2 - Maharastra Today

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने काही निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी इरॉसने त्यांच्या हाथी मेरे साथी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती. आता यशराजचा मोठा सिनेमा बंटी और बबली २ (Bunty Aur Babli 2) चे रिलीजही पुढे ढकलण्यात आल्याचे बॉलिवूडमध्ये सांगितले जाऊ लागले आहे. अर्थात यशराज फिल्म्सने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ते लवकरच नवीन डेट जाहीर करतील असे सांगितले जात आहे. हा सिनेमा २३ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार होता. या सिनेमासोबतच सलमान खानच्या (Salman Khan) राधेवरही (Radhe- your most wanted bhai) रिलीज पुढे ढकलण्याचे संकट ओढवल्याचेही म्हटले जात आहे.

‘बंटी और बबली २’ हा २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ (Bunty Aur Babli) सिनेमाचा सिक्वेल असून यात सैफ अली खान, रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ काम करीत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच हा सिनेमा एक कॉमेडी एंटरटेनर आहे. यशराजने फार पूर्वीच रिलीजसाठी थिएटर बुक करून ठेवले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने आणि काही निर्बंध एप्रिल एंडपर्यंत वाढवण्यात आल्याने यशराजने सिनेमाचे रिलीज होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सिनेमासोबतच प्रेक्षकांना ज्या सिनेमाची फार उत्सुकता आहे असा सलमान खानचा ‘राधे- यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाचे रिलीजही पुढे ढकलले जाण्याची शक्यता बॉलिवूडमध्ये वर्तवली जाऊ लागली आहे, हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर म्हणजे १३ मे २०२१ रोजी रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा सलमान खानने केली होती. परंतु आता मार्चमधील सिनेमांचे रिलीज रद्द करण्यात येत असून कोरोनाचा संसर्ग पुढेही आणखी काही महिने कायम राहाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे पाहूनच सलमान खानच्या सिनेमाचे रिलीजही पुढे ढकलले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. याबाबतच निर्णय सलमान खान स्वतःच लवकरच घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER