अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी उपोषणाला बसलेले राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Ram Kadam - Arnab Goswami

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब  गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेवेळी त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या नऊ पोलिसांना तत्काळ निलंबित करा. आणि अर्णब  गोस्वामींची सुटका करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मंत्रालयाच्या समोर गांधी स्मारकासमोर उपोषणाला सुरुवात केली. मात्र काही वेळातच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.  आपण पोलीस ठाण्यातही उपोषण करणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. अर्णब  गोस्वामी यांची तातडीने सुटका करा आणि सूडबुद्धीने केलेले त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरील आरोप मागे घ्या, अर्णब  यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या नऊ  पोलिसांना निलंबित करा, या मागणीवरून राम कदम यांनी काळी फीत बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला.

दरम्यान, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात आणले. महाराष्ट्रातल्या अप्रत्यक्ष आणीबाणीविरोधात आपण पोलीस ठाण्यातही उपोषण करत असल्याची घोषणा राम कदम यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER