रुग्णांचे नातेवाईक आणि अनावश्यक काळज्या…

Coronavirus Editorial

कोरोनाकाळात एकदा का संशयिताचं रूपांतर रुग्णात झालं की मग रुग्णालयांमधे जागा मिळणे, त्यानंतर ज्या रोगावर जगात कोठेही इलाज नाही, त्यावर कोविड सेंटर (COVID Center) किंवा सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालय अशा जागा मिळेल त्या ठिकाणी दाखल होऊन उपचार घ्यायचे. उपचार घ्यायचे म्हणजे कोरोनारोना झाल्यावर आहार व्यवस्थित मिळणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणं हे सारं केलं जातं.

पण या सर्व प्रवासात रुग्ण एकटा असतो कारण एकदा का रुग्णालयात रोगी दाखल झाला की त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. मोबाइलमुळे संपर्क शक्य आहे पण रुग्ण रुग्णालयात आणि घरातले जवळचे लोक त्यांच्या सगळ्या चिंता जवळ बाळगण्याऐवजी फोन करून पास ऑन करतात. त्यातल्या अनेकांना रुग्णाशी काय बोलू नये, याचे भान किंवा ज्ञानही नसते.

मग आपापल्या ओळखीतल्या होमिओपाथी, आयुर्वेद इथपासून पुष्पौषधी आणि अगदी अंकशासत्राच्या सहाय्याने सल्लासेवा देणारेही अचानक आठवतात. त्यांचे सल्लेही घेतले जातात. अशा वेळी काही ओळखीचे डॉक्टर कुठे तरी लांच्या उपनगरातले, रुग्ण पुण्यात ड़ॉक्टर पिंपरी किंवा चिंचवड, सांगवी अशा ठिकाणचे मग व्हिडियो कॉलवरून सल्लासेवा, तीदेखील खाद्या लांबच्या नातेवाइकाच्या आग्रहास्तव, हे सारं करोनारुग्णाला जबरदस्तीनं घ्यावं लागतं.

अर्थात, हे सारं करताना अंधश्रद्धेपेक्षा किंवा भोळसटपणापेक्षा आपला नातेवाईक लवकर बरा व्हावा, हीच इच्छा असते. पण या अतिउत्साहामुळे कदाचित रुग्णापेक्षाही त्याच्या सर्वात जवळच्या नातेवाइकांना होणारा त्रास अधिक असतो.

रुग्णाची तब्येत कशी आहे, हे विचारण्यासाठी वेगवेगळ्या वेळी फोन करायचे आणि तेही थेट रुग्णाला. मग रुग्णानं फोन उचलला नाही की जवळच्या नातेवाईकांना कळवायचे की मी चार वेळा फोन केला पण तिनं घेतला नाही किंवा त्यांनी घेतला नाही. मग काय घरातल्या तीन चार लोकांना कामाला लावले जाते. ते सगळे रुग्णाला सांगतात की आधी काकांशी बोलून घे, नंतर आत्यालाही फोन कर वगैरे.

करोनाकाळात आहारविहारविषयक पथ्यं पाळणं, स्वतःची काळजी स्वतः घेणं हे जसं आवश्यक तसंच रुग्णांची अतिकाळजी करून जवळच्या नातेवाइकांना त्रास होईल असं न वागणंही आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. करोनासंदर्भात पुण्याचं नाव जसं रा,ट्रीय पातळीवर गेलंय तसंच बरे होणाऱ्या रुग्मांसंदर्भातही पुण्यानं आघाडी मिळवलीय. त्याबरोबरच जम्बो कोविड सेंटरमधे आता डँश बोर्डची व्यवस्था करण्यात आलीय आणि कोविड सेंटरमधे असलेल्या कोणत्याही रुग्णाची माहिती खाटेचा नंबर टाकला की कळू शकणार आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना कोविड सेंटरमधे असलेल्या आपल्या रुग्णाच्या तब्येतीची सगळी माहिती कोणाशीही न बोलता मिळू शकणार आहे.

जम्बो कोविड सेंटरचे घाईघाईने झालेले उद्घाटन आणि दुरवस्था इथपासून ते आता जम्बो कोविड सेंटर खऱ्या अर्थानं सुसज्ज करण्यात प्रशासनानं यश मिळवलंय, हे खरं पण अशीच व्यवस्था संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि राज्यभर सर्व जिल्ह्यात होणं हेही आवश्यक आहे.

पुण्यामधे २५ ते ३० टक्के रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत. त्यामुळे सर्व जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सुसज्ज जाली तर एखाद्या शहरावर तिथल्या आरोग्य यंत्रणेवर अनावश्यक ताण येणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. करोनाबद्दल अगदी जून जुलैपर्यंत बेदरकार असलेले पुणेकर आता मात्र सजग होऊ लागलेत कारण आता करोना इतका पसरलाय की प्रत्येकाच्या ओळखीच्या, जवळच्या कुणाला ना कुणाला तरी करोना झालाय किंवा होऊन गेलाय. त्यामुळे सीइंग इज बिलिव्हिंग या उक्तीनुसार आता पुणेकरांना गांभीर्य लक्षात आलेलं आहे, असं सार्वजनिक वर्तनातून तरी दिसतंय. त्याचा फायदा होऊन करोना नियंत्रणात यावा, हीच इच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER