भाजपाचा निर्णय : लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना पंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारी नाही

BJP

लखनौ : उत्तरप्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांमध्ये कोणाही विद्यमान आमदार, खासदार, मंत्री किंवा लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकांना, कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा निर्णय प्रदेश भाजपाने घेतला आहे.

सध्या राजकारण म्हटले की घराणेशाही आलीच. अनेकदा तर एकाच घरातील तीन तीन पिढ्या अथवा एकाच घरातले सहा ते सात जण राजकारणात सक्रिय असतात. कोणी आमदार, कोणी खासदार तर कोणी मंत्री आणि कोणी महामंडळावर बसलेले असतात.

महिला आरक्षणात तर महिलेचे नाव लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून नावापुरतेच असते; प्रत्यक्षात त्या महिलेचा पती किंवा इतर कोणी पुरुष सदस्यच सर्व सूत्रे हलवत असतो; निर्णय घेत असतो.

उत्तरप्रदेश भारतीय जनता पक्षाने एक आदेश जारी केला असून, आगामी पंचायत निवडणुकांमध्ये कोणाही विद्यमान आमदार, खासदार, मंत्री अथवा लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकांना, कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे घोषित केले आहे. असा आदेश जारी करणारा भाजपा हा देशातला पहिलाच पक्ष ठरला आहे. पक्षाच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER