९० वर्षांच्या कोरोना रुग्ण महिलेला जंगलात सोडून नातेवाईक फरार

९० वर्षांच्या कोरोना रुग्ण

औरंगाबाद : कोरोना (Coronavirus) झाल्यामुळे एका ९० वर्षांच्या महिलेला तिच्या नातेवाइकांनी जंगलात बेवारस सोडून दिले. महिलेची ओळख पटली असून पोलिसांनी नातेवाइकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे व त्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.

कच्छी घाटीच्या जंगलात एक वृद्ध महिला बेवारस पडली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात भरती केले. चाचणीत तिला कोरोना झाल्याचे निदान झाले. ही रुग्ण पोलिसांना आढळली त्यावेळी अर्धवट शुद्धीत असल्याने नेमके काय झाले हे सांगू शकली नाही. पोलिसांनी तिला दवाखान्यात दाखल केल्यावर, उपचारानंतर तिला शुद्ध आली. तिने पोलिसांना सर्व माहिती सांगितली. त्यावरून पोलिसांनी नातेवाइकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेत आहेत. एका वृत्त वाहिनीने याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER