दहशतवादी संघटनेशी संबंध : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी बडतर्फ

j&k dsp davinder singh - Maharashtra Today

श्रीनगर : दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेला जम्मू – काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेता दवेंदर सिंह याला उपराज्यपालांनी बडतर्फ केले. याशिवाय सिन्हा यांनी कुपवाडा जिल्ह्यातील दोन शिक्षकांनाही काढून टाकले आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आली.

दवेंदर सिंहवर दहशतवादी संघटना हिजबूलशी (hizbul mujahideen) संबंध असल्याचा आणि त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपी दवेंदर सिंहविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दविंदर सिंहच्या व्यतिरिक्त कुपवाडाच्या दोन शिक्षकांनाही काढून टाकले आहे. या सर्वांवर संविधानाच्या कलम ३११ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांसोबत अटक

मागील वर्षी दवेंदर सिंहला काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिदीन संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आली (Hizbul Mujahideen) होती. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे ही कारवाई करण्यात आली होती. देविंदर सिंह अतिरेक्यांसोबत एकाच गाडीमध्ये होता. देविंदर सिंह गाडी चालवत होता, अशी माहिती उपमहानिरीक्षक अतुल गोयल यांनी दिली होती.

त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी देविंदर सिंह यांच्या घरी देखील धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एक AK 47, दोन पिस्तूल आणि तीन हॅण्ड ग्रेनेड सापडले. पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंहला दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक या पदवरुन त्यांची पोलीस उपअधीक्षकपदावर पदोन्नती करण्यात आली होती.

काळा भूतकाळ

दवेंदर सिंहचा भूतकाळ कळा आहे. याआधी त्याला १९९२ मध्ये ड्रग्ज प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. २००१ साली संसद भवनावर हल्ला झाल्ला होता. या हल्ल्याचा आरोपी अफजल गुरु याला २०१३ साली फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी याप्रकरणाशी दवेंदर सिंह याचा देखील संबंध असल्याचे उघड झाले होते. अफजल गुरुने फाशीची शिक्षा होण्याआधी याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी दवेंदर सिंह स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा सदस्य होता.

अफजल गुरुचे पत्र

अफजल गुरुने तिहार जेलमध्ये त्याच्या वकिलांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, “बडगामच्या हमहमा येथे तैनात असलेले डीएसपी दवेंदर सिंह यांनी मला मोहम्मद नावाच्या हल्लेखोराला दिल्लीला घेऊन जाण्यास सांगितले. तिथे त्याला भाड्याने घर खरेदी करुन देणे आणि त्याच्यासाठी कार खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता.” ९ फेब्रुवारी २०१९ ला अफजल गुरुला फाशी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ते पत्र सार्वजनिक केले होते.

दवेंदर सिंह जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अँटी हायजॅकिंग स्कॉडमध्ये होता. त्या अगोदर खंडणीप्रकरणी त्याला स्पेशल ऑपरेशन ग्रुपमधून काढण्यात आले होते. त्याला काही काळासाठी निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्याला श्रीनगर पीसीआरमध्ये तैनात करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button