नाता प्रथा- मॉडर्न लिव्ह इनचं भारतीय स्वरुप ?

Maharashtra Today

लिव्ह इन रिलेशनशीप! (Live In Relationship)समाजात विष कालवणारी, विवाह व्यवस्था नष्ट करणारी, मुलामुलींना भरकटवणारी, पाश्चिमात्य समजातीली जहरी संकल्पना, जी भारताची संस्कृती नष्ट करु पाहते, ही वाक्य आपण वारंवार ऐकली असतील. जास्त दुर जाणाच्या गरज नाही तुमच्या आधीच्या पिढी समोर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशीप हे शब्द उच्चारले तर मोठा विवाद सुरु होऊ शकतो.

भारतात आज लिव्ह इन रिलेशनशीपवर इतका विवाद आहे. परंतू ही परंपरा भारतीय समाजात कोणत्यानं कोणत्या शतकात स्वरुप बदलून अस्तित्त्वात होती. लिव्हीनला ‘नाता प्रथा’च्या स्वरुपाही बघितलं जाऊ शकतं. राजस्थानमध्ये ही प्रथा मुळं घट्ट रुजवून अस्तित्त्वात आहे.

राजस्थानमध्ये जिथं भ्रुण हत्या आणि ऑनर किलिंगसारख्या समस्या गंभीर आहेत. तिथं अनेक शतकांपासून नाता प्रथेचं पालन होतं आहे. अधुनिक काळात अनेक प्रथा आणि परंपरा व्हेंटीलेटवर आहेत परंतू भारता मात्र या प्रथेचा भरपूर प्रचार प्रसार होताना दिसतो आहे.

काही विशिष्ट जातींमध्ये आहे प्रथा

राजस्थानमध्ये प्रामुख्यानं राजपूत, गुर्जर, ब्राम्हण आणि जैन समुदायाचे प्राबल्य आहे. यापैकी गुर्जर जातीला सोडलं तर इतर तीन प्रमुख जातींना या प्रथेशी काही घेणं देणं नाहीये. राजकीय दृष्टीकोनातूनही गुर्जरांना तिथं मोठं स्थान आहे. काही मागास जात समुहांनी ही प्रथा जिवंत ठेवल्याचं ही चित्र आहे. या प्रथेची सुरुवात कधी झाली याची नोंद इतिहासाच्या पानांवर नाहीये. परंतू गुर्जरांसोबतच धाकड, जोगी, बिश्नोई, बंजारा सारख्या अनेक जातींमध्ये दशकांपासून ही प्रथा जिवंत आहे. लोकांकडे या प्रथेचा इतिहास सांगण्यासाठी काही गुळगुळीत वाक्य मात्र आहेत. जसंकी याच्या आजोबानं याच्या आजीला स्वतः सोबत ठेवलं. याच्या आईचा तो दुसरा नवरा आहे वगैरे वगैरे.

याला लिव्ह इन रिलेशनशीपचं जुनं रुप म्हणता येतं.स खास करुन विधवा महिला आणि परितक्त्या महिलांना सामान्य जीवन देण्यासाठी ही प्रथा सुरु झाली होती. प्रथेच्या सुरुवातीला महिलांना त्यांच्या आवडीच्या पुरुषासोबत राहण्याचं स्वातंत्र्य होतं. पुरुष या बदल्यात आयुष्यभर तिचा सुखा दुखात भागीदार होतो. यात काही कमी जास्त झालं तर त्या पुरुषाला सोडून दुसऱ्या पुरुषाशी नातं जोडण्याची सुट त्या महिलांना होती.य

ऐकायला हे वेगळं वाटत असलं तरी हे सत्य आहे. आजची सामाजिक मानसिकता जितकी संकुचित आहे आधी तितकी नव्हती याचं प्रमाण नाता प्रथा आहे. हेच कारण होतं की आधी महिला बाल विधवा झाल्या तरी त्यांना त्यांच संपूर्ण आयुष्य एकटेपणात व्यतीत करावं लागत नव्हतं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर महिलांना त्यांचा साथिदार निवडायचा अधिकार होता. नाता प्रथेत विवाहित, अविवाहित, विधवा महिलांसोबतच सर्व महिला आणि पुरुष सामिल होतात. या प्रथेचा स्वीकारण्यासाठी पतीला पत्नीला निश्चित आर्थिक मदत द्यावी लागते. यानंतर त्याला हे स्वातंत्र्य मिळतं. गावात पंचायत बोलवली जाते. त्याच्या सहमतीनं हा निर्णय घेतला जातो.

परंतू आता व्यापार होतोय

आतापर्यंत आपण नाता प्रथेबद्दल जी चर्चा केली त्याचं स्वरुप पाहता गेल्या काही दशकांपासून त्याला हानी पोहचली आहे. यावर राजस्थानमध्ये लिंगगुणोत्तरातील विषमतेचा प्रभाव पडला आहे. २०१११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमगे ८५० हून कमी महिला होत्या. ढासळत्या लिंग गुणोत्तराने नाता प्रथेला ही हानी पोहचवली आहे. महिलांच्या घटत्या संख्येने त्यांच्या अधिकारांवरीह मर्यादा आणली आहे.

नाता प्रथेला आता व्यापाराचं रुप आलंय. त्यामुळं मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. उदयपुरच्या कसोट गावमध्ये एका महिलेने दुसऱ्या युवकासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या पतीने २ लाख रुपयांची मागणी केली. या रकमेला अदा करण्यात तो युवक अपयशी ठरल्यामुळं पतीने त्याच्या पत्नीला आणि त्या युवकाला झाडाला नग्न बांधून मारहाण केली होती.

एखादी महिला जास्तीजास्त पाच वेळा नाता प्रथेचा अवलंब करु शकते. याच्या आडून शारिरिक शोषण ही होत असल्याचं चित्र आहे. नाता प्रथेमुळं जन्मणाऱ्या संतीतींना नाकारण्याचं त्यांची जबाबदारी झटकण्याची प्रकरणही समोर येतं आहेत. अशा परिस्थीती एनजीओ मध्यस्ती करुन परिस्थीती सुधरवण्याचं काम करत असल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button