राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्रासमान, आणि तसेच राहावे – संजय राऊत

Sanjay Raut - Uddhav Thackeray - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत शुक्रवारी भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन पुकारण्यात आलं होत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटसमयी विरोधकांनी राजकारण न करता सरकारला साथ द्यावी असा सल्लाही सत्ताधाऱ्यांनी भाजपला दिला आहे. त्यातच आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सर्वाना बुचकळ्यात टाकले.

ही बातमी पण वाचा:- यावेळी मात्र संजय राऊतांनी राज्यपालांना घातला साष्टांग दंडवत

राऊत यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेत राज्यातील परिस्थिती आणि सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. अनेक दिवसांपासून त्यांची भेट घेतलेली नव्हती. त्यामुळे आज भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मधुर संबंध आहेत. त्यांचे पिता-पुत्रासमान संबंध असून, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, ते आमच्यासाठी मार्गदर्शक आणि आदरणीय आहेत. आज सदिच्छा भेट होती. राज्यपाल हे घटनात्मक पद, ते या राज्याचे पालक, ते प्रियच असतात. याला राजकारणाशी जोडू नये असेही राऊत म्हणाले.

तसेच भाजपच्या कालच्या आंदोलनावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने संकटाच्या काळात असे प्रकार करायला नको होते. विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी. राजकारण सोडून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकारच्या बाजूने उभे राहायला हवे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER