राम आणि शिवसेनेचा काय संबंध : अजित पवार

Ajit Pawar

खेड : निवडणुका आल्या की शिवसेनेला प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, साडेतीन वर्षे झोपला होतात का ? असा प्रश्न राकाँचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला केला आहे.

भाजपावर टीका करताना त्यांनी हनुमानाच्या जातीवरून सुरू असलेल्या वादाकडे संकेत करताना प्रश्न केला की, देवांच्या जाती कशाला काढता?.

जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्योग सुरु आहे. निवडणुकीच्या आधी जाहीर केले ते देता येत नसल्याने हे उद्योग सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांमुळे कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक!

शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटिंग करत आहेत, ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे, असा प्रश्न अजित पवारांनी केला.

मागच्या दाराने आणीबाणी आणली जात आहे, हा भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.