मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसची रेकी करणारे ATS च्या ताब्यात

Uddhav Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची रेकी केली. फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली.

सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याका माहीत नसल्याचे सांगितले. मात्र ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे. बंगल्याची पाहणी करुन तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER