
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी संजय पाटील (Sanjay Patil)यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. यावेळी मनसेतून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवक संजय भालेराव (Sanjay Bhalerao)यांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे.
भालेराव यांची घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. संजय भालेराव यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका संजना भालेराव यांनी 2017 मध्ये मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला