राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी नियमावली जाहीर

Unlock-5 Restaurant Guidelines

मुंबई : राज्यात हॉटेल (Hotel), रेस्टॉरंट (Restaurants), बार (Bar) सुरू करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली (गाईडलाईन्स) घोषित केली आहे. कोरोना साथीबाबत दक्षता घेऊन नियमांचे पालन करून आस्थापने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येते आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन ३० ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आले आहे. ‘अनलॉक-५’च्या (Unlock-5) टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरू होणार आहेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी खालीलप्रमाणे नियमावली जाहीर केली आहे :

१) प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहेत का? तपासावे. (उदा. तापमान, सर्दी, खोकला) शरीराचे तपमान १००.४ पेक्षा जास्त असणाऱ्यांना प्रवेश देऊ नये.

२) लक्षणविरहित ग्राहकांनाच केवळ प्रवेश द्यावा.

३) हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंद ठेवावी.

४) सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.

५) ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवा. त्यामुळे कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.

६) ग्राहकांना मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

७) प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय असावी.

८) शक्यतो पैसे डिजिटल पद्धतीने स्वीकारावे.

९ ) वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परिसर कायम तपासत राहा. तिथे स्वच्छता राहील याची काळजी घ्या.

१०) ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवा.

११) सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवा.

१२) मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणे आवश्यक असेल.

१३) ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी हॉटेलमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

१४) दोन टेबलमध्ये सुरक्षित (फुटांचे) अंतर ठेवा.

१५) वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता करणे आवश्यक असेल.

१६) हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER