मराठा आरक्षणावर २७ जुलैपासून नियमित सुनावणी

Regular hearing on Maratha reservation from July 27-SC

मुंबई :- मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. दरम्यान, २७ जुलैपासून मराठा (Maratha) आरक्षणवर नियमित सुनावणी केली जाणार आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के तर नोकरीमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सरकारी पक्षानं आपली बाजू मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER