खत पुरवठा नियमित करा : खा. मंडलिक यांनी पुरवठादारांना सुनावले

Sanjay Mandlik

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू पाठोपाठ लॉकडाऊन जाहीर केल्याने देशात सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद झाली. परिणामी जिल्ह्यात खतांचा तुटवडा वाढत होता. लॉकडाऊन शिथील झालेनंतर वाहतूक सेवा सुरु झालेनंतर सहकारी संघांना खतांचा पुरवठा न करता खासगी डिलरना खतांचा पुरवठा खत उत्पादक कंपन्यांकडून केला जातो. आवश्यक त्या प्रमाणाप्रमाणे युरिया पुरवठा केला जात असल्यामुळे जिल्ह्यात युरीयाची कृत्रीम टंचाई झाली असल्याच्या कारणावरून खत उत्पादक कंपनीच्या अधिका-यांना खासदार संजय मंडलिक यांनी शासकीय विश्रामधाम येथे आयोजित केलेल्या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, यांचेसह खत पुरवठा करणाऱ्या सुमारे अकरा कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.

यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सहकारी संघांना खतांचा पुरवठा न करता खाजगी पुरवठादारांना खत पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी रेषोप्रमाणे युरीयाचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सहकारी संस्था व खाजगी डीलर यांना समप्रमाणात युरियाचा पुरवठा करावा असे त्यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER