दापोलीत दस्त नोंदणी कार्यालय बंद

Registration offices-in- dapoli

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची दस्त नोंदणी कार्यालये सुरू झाली असली तरी दापोली येथील या विभागातील अधिकारी होम क्वारंटाईन झाल्याने या कार्यालयातील कामकाज १४ दिवस बंदच राहणार आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेले भाग सोडून राज्यातील काही जिल्ह्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अशी कार्यालये सुरू झाली आहेत.

मात्र, दापोली येथील या विभागातील अधिकारी होम क्वारंटाईन झाल्याने या कार्यालयातील कामकाज १४ दिवस बंदच राहणार आहे. ते कल्याण-डोंबिवली या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणाहून आल्यामुळे त्यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दापोलीतील हे कार्यालय आता काही दिवस बंद राहणार असून त्यामुळे जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसह अन्य कामे आता बंद राहणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER