कोरोनावरील लसीकरणासाठी COWIN अ‌ॅपवर असे करा रजिस्ट्रेशन

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी CoWIN अप हे लाँच केले आहे. लसीकरणासाठी नागरिकांना या अ‌ॅपवर रजिस्टर करता येणार आहे. त्यानुसार त्यांना आपल्या जवळचे वॅक्सीनेशन सेंटर सुद्धा निवडता येणार आहे. सर्वांना २८ दिवसांच्या कालावधीत लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत.

रजिस्ट्रेशन करायचे असल्यास त्यासाठी Registration Of The Vaccination पेजवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक फोटो आयडी प्रूफ निवडावा लागणार आहे. आयडी क्रमांक टाकल्यानंतर तेथे लिंग, जन्मतारीख द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला Yes किंवा No हा ऑप्शन दाखवला जाणार असून अखेर तुम्ही रजिस्टर बटणावर क्लिक करु शकता.

  • सर्वात प्रथम तुम्हाला www.cowin.gov.in वर भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक दिल्यानंतर एक ओटीपी तुम्हाला येईल..
  • ओटीपी आल्यानंतर तो द्यावा लागणार आहे.
  • ओटीपी दिल्यानंतर व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करावे.
  • दुसऱ्या डोससाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल.
  • झालेल्या लसीकरणासाठी केंद्रावर अर्धा तास थांबावे लागणार.

तसेच आपल्या सोयीनुसार लसीकरणाचे सेंटर निवडता येणार आहे. लसीकरण तुम्हाला कोणत्या दिवशी करायचे आहे त्याची तारीख निवडावी पण त्यासाठी तुम्हाला एक स्लॉट दिला जाईल. त्याचसोबत तुम्ही लसीकरणाची तारीख शेड्युल सुद्धा करु शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER