येदियुरप्पांच्या सचिवाविरुद्धचा खटला रद्द करण्यास नकार

B.S. Yeddyurappa

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांचे राजकीय सचिव (Political Secretary) एन. आर. संतोष यांच्याविरुद्ध सुरु असलेला अपहरणाचा प्रयत्न केल्याचा खटला रद्द करण्यास तेथील उच्च न्यायालयाने नकार दिला. माजी विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांचे सल्लागार विनय यांच्या अपहरणाचा कथित प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संतोष यांच्यावर हा खटला सुरु आहे. या घटनेनंतर हे ईश्वरप्पा ‘भाजपा’वासी झाले व सध्या ते येदियुरप्पा यांच्याच मंत्रिमंडळात पंचायतीराज खात्याचे मंत्री आहेत.

ही बदललेली राजकीय समिकरणे लक्षात घेऊन संतोष यांनी खटला रद्द करण्यासाठी याचिका केली होती. गेली दोन वर्षे तपास करूनही पोलिसांना आपल्याविरुद्ध कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु हीयाचिका फेटाळताना न्या. एच. पी. संदेश यांनी म्हटले की, फौजदारी गुनह्याचे कट खूप सावधपणे आखले जातात. त्यामुळे त्यासंबंधी थेट पुरावा क्वचितच मिळतो. असे गुन्हे अप्रत्यक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांनीच सिद्ध केले जाऊ शकतात.  मात्र त्यासाठी तपास पूर्ण होऊन खटला चालणे गरजेचे असते.

विनय यांनी ही फिर्याद मे २०१७ मध्ये नोंदविली होती.  एका अत्यंत महत्वाच्या प्रकरणाशी संबंधित सीडी, पेन ड्राईव्ह व अन्य साहित्य हस्तगत करण्यासाठी सतोष यांच्यासह नऊ जणांनी जबरदस्तीने मोटारीत कोंबून  १७ मे रोजी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण आरडा-ओरडा केल्यावर आपल्याला धावत्या मोटारीतून बाहेर ढकलून हल्लेखोर पळून गेले, असा त्यात आरोप करण्यात आला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER