
नवी दिल्ली : पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्यास काही कारणास्तव जर आपला प्रवेश रद्द करावा लागला तर विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्याचे संपूर्ण शुल्क परत करावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने (UGC) दिले आहेत.
30 नोव्हेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, त्यांना या आदेशानुसार संपूर्ण शुल्क परत मिळणार असून जे विद्यार्थी 31 डिसेंबरपर्यंत प्रवेश रद्द करतील, त्यांना एक हजार रुपये प्रोसेसिंग फी कापून बाकीची रक्कम परत मिळेल.
कोरोना (Corona) संकट तसेच इतर काही कारणांमुळे असंख्य पालकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने वरील निर्णय घेतला असून तो केवळ चालूवर्षी लागू राहणार असल्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला