रिफायनरी समर्थक मेळाव्याचे उत्तर मेळाव्यानेच देणार; समर्थकांची जोरदार तयारी

ShivSena Flags

रत्नागिरी/ प्रतिनिधी :- रिफायनरीला विरोध करण्यासाठी शिवसेनेकडून घेण्यात येत असलेल्या मेळाव्याला मेळावा घेऊनच प्रत्त्युत्तर द्यायचा निर्णय रिफायनरी समर्थकांनी घेतला असून शिवसेनेचा 1 मार्चचा मेळावा झाला की लगेचच दुसऱ्या दिवशी समर्थनाचा मेळावा होणार आहे.

ग्रीन रिफायनरीचे नकारार्थी उत्तर देण्यासाठी शिवसेनेने भव्य सभेचे आयोजन केले आहे. याच सभेच्या दुसऱ्याच दिवशी ग्रीन रिफायनरीसाठी समर्थकांची जाहीर सभा होणार आहे. कोकण जन कल्याण प्रतिष्ठानसह विविध संघटनांनी ही जाहीर सभा आयोजित केली आहे. डोंगर तिठा येथे सोमवारी दुपारी २ वाजता समर्थकांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी ग्रीन रिफायनरीला समर्थन करणाऱ्या सर्व संघटनासह स्थानिक राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेत ग्रीन रिफायनरी झालीच पाहिजे असा ठराव घेतला जाणार आहे.