रिफायनरी प्रकल्पाला आता काँग्रेसकडून समर्थन ; जुनेद मुल्लाची माहिती

राजापुर :- सुरुवातीच्या काळात रिफायनरी प्रकल्प (Refinery project) विरोधी जोरदार भूमिका घेणाऱ्या काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या (Corona) तडाख्यानंतर त्या प्रकल्पाबाबत असलेली भूमिका बदलत समर्थनाची भूमिका घेतली आहे. कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि येथील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक प्रकल्पांची आवश्यकता आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा प्रकल्पांच्या समर्थनाची भूमिका घेतल्याने कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जुनेद मुल्ला (Junaid Mulla) यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला तालुक्यातून आता सर्वपक्षीय पाठिंबा मिळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय समर्थकांनी बैठक घेत रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, याकरिता संघटीतपणे लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.

काँग्रेस नेहमीच अशा राष्ट्रीय प्रकल्पांच्या समर्थनार्थ ठामपणे उभा राहिला आहे . पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताची आधुनिक मंदिरे म्हणत असत. काँग्रेसची मंदिरांची व्याख्या ही अशी आहे. त्याला अनुसरूनच कोकणातल्या समस्त काँग्रेसजनांनी अशा औद्योगिक प्रकल्पांचे कोकणात स्वागत करायचे ठरवले आहे. त्यामुळे इतरांनी आमच्या ध्येय धोरणाबद्दल जनतेची दिशाभूल करू नये, असेही मुल्ला यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER