विजेच्या वाढीव बिलात कपात : ग्राहकांना मिळू शकते दिवाळीची भेट – नितीन राऊत

Nitin Raut

मुंबई : वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील वीज ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळेल, असे संकेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी काल दिले. राज्यातील नागरिकांना ही दिवाळी भेट लवकरच मिळेल, असे ते म्हणालेत.

राज्यातील अनेकांनी आपल्याला वाढीव बिल आल्याची तक्रार केली आहे. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संबंधात राज्याच्या वित्त विभागाला सात वेळा प्रस्ताव पाठवण्यात आला. आता त्याला काही प्रमाणात यश येऊ लागले, असे दिसते आहे असेही त्यांनी सांगितले.

काल (सोमवारी)च या संबंधात मातोश्रीवरून चर्चा करण्यासाठी निमंत्रण आले होते. वित्त विभागाकडे आता ही सवलतीच्या प्रस्तावाची फाईल पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच दिवाळीची भेट मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

मुंबईत 12 ऑक्‍टोबरसारखी स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी टाटा पॉवरला वीज उत्पादन वाढवण्याचीही सूचना केली आहे.खासगी वीज उत्पादकांची दोन युनिट सध्या बंद आहेत. राऊत यांनी काल टाटा पॉवरला भेट दिली. त्यावेळी तेथे ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्याच्या वीज विभागाच्या तीन विभागांमध्ये सध्या समन्वयाचा अभाव दिसतो तिनही विभागांना परस्परांतील समन्वय वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER