‘माझीही सुरक्षा कमी करा’ शरद पवारांच्या चालीने संबंधित नेत्यांच्या विरोधाची हवा काढली

Sharad Pawar

मुंबई : भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे .

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘माझी सुद्धा सुरक्षा कमी करा’ अशी गुगली टाकून संबंधित नेत्यांच्या विरोधाची हवा काढली आहे . महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माजी मंत्री आणि विरोधकांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी ‘माझ्या सुरक्षेत कपात करावी’ अशी मागणीच केली आहे. ‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, तर माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी’, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER