आमदारांचा निधी दोन कोटींनी कमी करा, कामगारांना द्या : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) विळखा बनत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा सरकारचा विचार आहे. अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली. यावर भाजपने (BJP) संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करू; पण गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.

राज्यातील आमदारांचा विकासनिधी दोन कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना पाच हजार रुपये द्या, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असे मत मांडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button