कोरोना लसीचे दर कमी करा, केंद्राची सीरम आणि भारत बायोटेकला सूचना

Corona Vaccine

नवी दिल्ली :- जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड-19 विषाणूवरील लशींची किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर देशांत लशींच्या किमती खुल्या बाजारात फार जास्त नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या किंमतीवरून सुरु असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावरून केंद्र सरकारने आता भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) लसीचे दर कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. केंद्र सरकारने या दोन्ही लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना किंमतीत घट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोविड १९ लस कोविशील्डची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रतिडोस असेल तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस किंमत आकारण्यात येईल. १५० रुपये प्रतिडोस किंमतीत ही लस केंद्र सरकारला उपलब्ध करणार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर झालेल्या टिकेकनंतर केंद्रालाही ही लस ४०० रुपयांनी खरेदी करावी लागणार असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली होती. १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे १ मे पूर्वी कंपन्यांनी लसीचे दर कमी करावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

तर दुसरीकडे भारत बायोटेकनं कोव्हॅक्सिनची किंमत राज्य सरकारसाठी ६०० रुपये प्रतिडोस ठेवली आहे तर खासगी हॉस्पिटलसाठी या लसीची किंमत १२०० रुपये प्रतिडोस ठरवली आहे. कंपनीचे चेअरमन कृष्णा एम एल्ला यांनी निवेदनात सांगितले आहे की, भारत बायोटेक केंद्र सरकारला १५० रुपये दराने लस देणार आहे. निर्यातीसाठी कोव्हॅक्सिनचे दर १५ ते २० डॉलर इतके निश्चित करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button