या ख्रिसमसला बनवा ‘स्पेशल रेड वेलवेट केक’

Red Velvet Cake

नाताळ किंवा ख्रिसमस आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टसची जणू काही गर्दीच होते. त्यात मुख्य म्हणजे केक. केक शिवाय क्रिसमस कसं साजर होणार?? म्हणून आम्ही घेऊन आलो आहे खास ख्रिसमस निम्मित ‘स्पेशल रेड वेलवेट केक’. रेड वेलवेट केक दिसायला खूप मस्त दिसतो. त्याच्या लाल मखमली रंगामुळेच हे नांव पडले. करायला एकदम सोपा, दिसायला देखणा अन् खायला एकदम मऊ, लुसलू़शित गोड असा केक.

ही बातमी पण वाचा : बडीशेपचा सेवन करा आणि वजनाला नियंत्रित करा….

साहित्य :- 

 • मैदा (दीड)१ १/२ कपरेड वेलवेट केक
 • पीठीसाखर  १/२ कप
 • बेकिंग पावडर १ टीस्पून
 • बेकिंग सोडा १/२ टीस्पून
 • कोको पावडर १ टेस्पून
 • रिफाइंड तेल/बटर १/२ कप
 • दूध १/२ कप
 • कन्डेंस्ड मिल्क १/२ कप
 • रेड कलर १ टीस्पून
 • व्हँनिला इसेन्स १ टीस्पून
 • व्हिनेगार १ टीस्पून

साहित्य फ्राँस्टींगसाठी  

 • क्रिमचीज १ कप (अंदाजे २०० ग्रँम)
 • व्हिपिंग क्रिम १ कप
 • बटर २ टेस्पून
 • व्हिनेगार १ टीस्पून
 • पीठीसाखर /आईसिंग शुुगर १/२ कप (आवडीनुसार अधिक घेऊ शकता)
शुगर सिरपसाठी :- पीठीसाखर ३ टीस्पून +पाणी २ टेस्पून

कृती :- १) प्रथम एका बाऊलमधे कोरडे साहित्य मैदा, बेकींग पावडर, सोडा, कोको पावडर एकत्र चाळून घ्यावे. नंतर दुसर्या बाऊलमधे बटर, साखर, दूध, कन्डेंस्ड मिल्क, इसेंन्स, व्हिनेगार व रेड कलर एकत्र ढवळून घ्यावे. आता तयार ओल्या मिश्रणात वरील कोरडे साहित्य हळू-हळू मिसळावे. गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी. आता तयार केक बँटर ग्रीसिंग केलेल्या केक टीनमधे ओतून 180° डीग्री प्रीहीट ओवनला ३० मिनिट शिजवावा.

) नंतर पुर्ण गार झाल्यावर वरील फ्राँस्टींग करावे.फ्राँस्टींगसाठी वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून बिटरने ढवळावे व क्रिम तयार करावे.आता केकचा वरील व साईडचा थोडा कडक भाग कापून चूरा करून डेकोरेशन साठी कडेला ठेवावा. नंतर केक मधून स्लाईस मधे कापून दोन लेयर करून घ्यावेत. आधी एका भागावर शुगर सिरप लावून घ्यावे व त्यावर तयार क्रिमचा जाड थर पसरावा. नंतर त्यावर कापलेला दुसरा भाग ठेवून शुगर सिरप लावून, त्यावर परत क्रिमचा थर पसरवावा. शेवटी ठेवलेला चूरा मधे व बाजूला लावावा. तसेच क्रिम पाईपिंग बँगमधे भरून नक्षी करावी. तयार केक फ्रिजमधे ठेवावा. खायच्या ऐत्यावेळी बाहेर काढून,मस्त सेट झालेला केक कापून खायला द्यावा.