
नागपूर :- राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, अशी माहिती आज शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.
आरोग्य आणि गृह खात्यांमध्ये मिळून १३, ८०० पदांची पहिल्या टप्प्यात भरती केली जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २३१ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळे अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला