‘एसबीआय’मध्ये इंजिनिअर पदासाठी भरती

SBI Recruitment

नवी दिल्ली :- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) इंजिनिअर (Engineer) पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी कोणतीही लेखी परिक्षा घेतली जाणार नाही. अगोदर उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. या पदासाठी वेतनक्षेणी दरमहा २३,७०० रुपये ते ४२,०२० रुपये असणार आहे.

या पदासाठी एकूण जागा १६ आहेत. नॅशनल फायर सर्विस कॉलेजमधून बीई युजीसी, एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक पूर्ण झालेल्या विद्यार्थी या पदासाठी अर्ज करु शकतात. वयोमर्यादा ४० वर्ष असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २२ डिसेंबर २०२० पासून सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२१ होती. पण आता ती वाढवून २७ जानेवारी २०२१ केली आहे. आपण या नोकरीसाठी अर्ज करणार असाल तर प्रक्रिया पूर्ण करु शकता. अर्ज करण्यासाठी जनरल, ईडब्ल्यूसी व ओबीसी उमेदवारांसाठी ७५० रुपये तसेच एससी व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही. माहितीसाठी https://www.sbi.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER