… आहोटीनंतर भरती; खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar & Eknath Khadse

अहमदनगर : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली – निसर्गाचा नियम आहे, आहोटीनंतर भरती. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ म्हणत खडसे यांच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या प्रवेशाचे स्वागत केले.

रोहित पवार यांच्या या प्रतिक्रियेला २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचा संदर्भ आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार व नेते पक्ष सोडून गेलेत. राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता राज्यात पुन्हा येणार नाही असा या साऱ्यांचा कयास होता. राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकारणाने नाट्यमय कलाटणी घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सोबत येऊन सरकार स्थापन केले. भाजपा सत्तेच्या बाहेर फेकली गेली.

आज भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. भाजपाचे आणखी काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्वादीचे नेते करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER