१०० कोटींची वसुली : मला तोंड उघडायला लावू नका, ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सुनावले

दिल्ली : काँग्रेसमधून (Congress) भाजपामध्ये (BJP) आलेले ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) राज्यसभेत आर्थिक विधेयकावर बोलत असताना काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ केला त्यावेळी काँग्रेसवर हल्ला करताना ज्योतिरादित्य यांनी सुनावले – मला तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तराँमधून १०० कोटींची वसुली केली जातेय आणि ती सुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून!

राज्यसभेमध्ये ज्योतिरादित्य शिंदे बोलत असताना काँग्रेसच्या काही खासदारांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol – Diesel) किंमतींवरुन गोंधळ घालणे सुरू केले. त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. शिंदे म्हणालेत, इंधनाचे दर वाढले आहेत हे खरे असले तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यालाही मर्यादा असते. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना ४० टक्के तर केंद्राला ६० टक्के हिस्सा मिळतो. ६० टक्क्यांपैकीही ४२ टक्के केंद्राकडून राज्यांना परत जातात. त्यामुळे राज्यांना एकूण किती टक्क्यांपर्यंत पैसे मिळतात? केंद्राकडे केवळ ३६ टक्के शिल्लक राहतात.

महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सर्वात जास्त आहेत. महाराष्ट्रात तुम्ही यासंदर्भात काहीच करत नाहीत. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की ज्यांची स्वत:ची घर काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, असा टोमणा ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या खासदारांना मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER