वसुली सरकारने तुटपुंजी मदतही लाभार्थ्यांना दिली नाही; भाजपची ठाकरे सरकारला विचारणा

Uddhav Thackeray - keshav upadhye - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोना  रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाकरे सरकारने अनेक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला आहे. १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाही.

सांगा गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल भाजपाने (BJP) उपस्थित केला आहे. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुख्यमंत्रीजी सांगा गरिबांनी जगायचं कसं? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला.  त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा… पाच  लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते.

किती जणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही. ” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी “संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाही” असं म्हणत निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button