महाराष्ट्रात यंदा विक्रमी शेतीचे उत्पादन; विश्वजीत कदम यांचा विश्वास

Vishwajeet Kadam

सांगली : गेल्यावर्षी राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात १२ टक्क्याने शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन शासन करतील. त्यामुळे यंदा विक्रमी शेतीचे उत्पादन होईल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यंदाच्या वर्षी हवामान विभागाकडून वेळेत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. यादृष्टीने राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडल्या. या बठकीत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना लागेल त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गतवर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतीचे १२ टक्के उत्पन्न वाढले. या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येतील. यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.

कलाकारांना आर्थिक मदत

सांगलीतील नमराह कोरोना सेंटरला विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. या कोरोना सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर माफक दरात उपचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी या सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलागीकरण कक्ष सुरू आहेत. आज असे कलाकार आहेत, त्यांना रूग्णांच्या मनोरंजनासाठी काम न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button