
नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयावर नेमलेल्या १० अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने केली आहे. आता राष्ट्रपती त्यांच्या कायम न्यायाधीश म्हणून नेमणुकीचे आदेश काढतील. यामुळे उच्च न्यायालयातील कायम न्यायाधीशांची संख्या आता ५७ होईल .
कायम केले जाणार असलेले न्यायाधीश असे: अविनाश गुणवंत घारोटे, नितीन भगवंतराव सूयर्वंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, एम. जी. शेवलीकर, व्ही. जीय बिश्त, भालचंद्र उग्रसेन देबडवार, एम.एस. जवळकर, एस. पी. तावडे आणि एन. आर. बोरकर.
यापैकी घारोटे, सूयर्वंशी, किलोर आणि जाधव या चौघांना ऑगस्ट , २०१९ मध्ये तर इतरांना डिसेंबर, २०१९ मध्ये अतिरिक्त न्यायाधीश नेमले गेले होते. सध्या नागपूर खंडपीठावर असलेल्या न्या. पुष्पा गनेडीवाला यांना या १० जणांच्या आधी अतिरिक्त न्यायाधीश नेमले गेले होते. त्यांनाही कायम करण्याची शिफारस ‘कॉलेजियम’ने याआधी केली होती. परंतु त्याच सुमारास न्या. गनेडीवाला यांनी काही ‘पॉक्सो’ खटल्यात वादग्रस्त निकाल दिल्यानंतर ती शिफारस मागे घेऊन त्यांचा अतिरिक्त न्यायाधीशपदाचा कालावधी एक वर्षाने वाढविण्यात आला होता.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला