चीनमधील जिआन्ग्सू आणि महाराष्ट्र राज्यात भगिनी – राज्य करार करण्याची शिफारस

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई  :- चीनमधील शांघाय व मुंबई या दोन शहरांमध्ये भगिनी-शहर करार झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि जिआन्ग्सू प्रांत यांमध्ये देखील भगिनी राज्य करार झाल्यास उभय राज्यांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी आज व्यक्त केला.

त्यांग गुकाई यांनी शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

त्यांग गुकाई यांच्या सूचनेचे स्वागत करताना भारत आणि चीनमधील संबंध राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर तसेच त्यांच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेसोबत झालेल्या चर्चेनंतर अधिक मजबूत झाले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : राज्यपालांच्या निर्णयानंतरच भूमिका स्पष्ट करू