कै. खाशाबा जाधव आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्म पुरस्कारसाठी शिफारस

Sindhutai Sapkal - K. D. Jadhav

सातारा : ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Dadasaheb Jadhav) यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून कुस्ती प्रेमींच्या वतीने सुरू आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पद्म पुरस्कार समितीने केंद्रीय समितीकडे पै. खाशाबा जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. याचबरोबर सामाजिक कार्य विभाग ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या नावाचा समावेश केला आहे.

हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती प्रकारात पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती. स्वतंत्र्योत्तर भारतात देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची कामगिरी खाशाबा जाधव यांनी केली. खाशाबांनी रचलेल्या या इतिहासानंतर देशाच्या 16 खेळाडूंनी विविध खेळाडू देशाला ऑलिम्पिक पदके मिळवून दिली. या सर्व 16 खेळाडूंचा गौरव पद्म पुरस्कार देऊन करण्यात आला. मात्र, देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांना या पुरस्कारापासून आजतागायत वंचित राहावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER