
औरंगाबाद : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील मुफ्ती, आलीम, हाफीज, मौलवी, धर्मगुरु, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व व्यापा-यांची बैठक बोलावली. सिल्लोड व गंगापुर तालुक्यातील बैठक घेऊन त्यांनी सोशल डिस्टंसिंगव फिजीकल डिस्टंसिंगचे योग्य नियोजन करुन संवाद साधला. यावेळी त्यांनी ईदची प्रार्थना घरातच पठण करावी असे आवाहनही केले.
येत्या २५ मे रोजी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी प्रार्थनेकरिता ईदगाहवर न जाता तसेच सामुहिक व घराच्या छतावर प्रार्थना न करता घरातच पठण करावे. सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम संघटीत होऊन करणे टाळावे. संचारबंदी असल्याने ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इतर नातेवाईकांच्या घरी जाणे अथवा आपल्या घरी येणा-या नातेवाईकांच्या भेटी शक्यतो कटाक्षाने टाळाव्यात. संचारबंदी शिथीलीकरणाच्या काळात सामान खरेदी करताना फिजिकल डिस्टंसिंग पाळणे, घरातील एकाच व्यक्तिने सामान खरेदीकरिता जावे, मास्क व हात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा किंवा सॅनिटायझर्सचा नियमीत वापर करणे, गर्दीची ठिकाणी टाळावी असेही आवाहन केले.
त्याचप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, पैठणचे सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल, संदीप गावीत, जगदीश सातव, गोपाळ रांजणकर, सुदर्शन मुंढे यांनी जिल्ह्यातील सिल्लोड, गंगापुर, वैजापुर, पैठण, खुलताबाद, देवळाई, गांधेली, वरुडकाजी, वेरुळ, करमाड, गोलटगाव, लासूर स्टेशन, शिऊर, बिडकीन, कन्नड, पिशोर, सोयगाव, अजिंठा, भराडी इत्यादी ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीत सूचना दिल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला