सणासुदीच्या दिवसात बनवा पौष्टिक गव्हाच्या पीठाचे लाडू

wheat flour ladoo

सणासुदीचे दिवस लवकरच येत आहेत. ह्या दिवसात नवीन काई बनवायचे हा प्रश्नच असतो. घरच्या गृहिणीला सर्वांच्या आवडीनिवडी आणि तब्येती ध्यानात ठेऊनच गोडधोड बनवावं लागत. लाडू हा गोड पदार्थ फार जुना आहे. पण मी ज्या लाडू ची पाककृती सांगणार आहे ती थोडी सुधारित आणि सर्वांसाठी बेस्ट असणार आहे. तुम्हाला बनवायला नक्की आवडेल. ह्या लाडूत भरपूर प्रमाणात फायबर आणि नुट्रीशन आहेत. अगदी डायबेटिज असणारेही खाऊ शकतात, जर शुगर कंन्ट्रोल मध्ये असेल तर. जे वजन बॅलन्स करण्यासाठी प्रयत्नशील नाही, ते हि बिनधास खाऊ शकतात. सर्व वयाचे लोकांसाठी अगदी उत्तम मेनू आहे. ह्या पाककृती मध्ये आपण पाणी, साखर, किंवा साजूक तूप असं काहीही वापरणार नाही. येत्या सणासुदीच्या दिवसात, हे पौष्टिक लाडू बनवून आपल्या प्रियजनांना आनंदी करा. नक्कीच तुम्हला नवीन काहीतरी बनवण्याचा समाधान मिळेल.

साहित्य :-  wheat ladoo

  • 1 कप गव्हाचे पिठ
  • 2 कप खजूर (सुमारे 30 खजूर)
  • 1 कप मध
  • 1 कप अक्रोड
  • 1 कप बदाम
  • 2 टिस्पून किशमिश / भोपडा बियाणे / टरबूज बियाणे (आवडीनुसार)
  • चवीनुसार वेलची पावडर
  • चवीनुसार जायफळ पावडर
  • चिमूटभर मीठ

टीप : मोजमाप आपल्या सोयीनुसार कोणत्याही कप किंवा वाटी घ्या, आणि त्यानुसारच सर्व साहित्य घ्या.

कृती :- गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या, करपू देऊ नका. तपकिरी रंग होई पर्यंत भाजून घ्या. मी १ टिस्पून सोजीरवा सुद्धा घालते, त्यानी लाडूवर क्रिस्टल सारख्ये बिंदू दिसतात, तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नका घालू. पीठ भाजायला ५ ते ७ मिनिट लागतील. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या. तुपाऐवजी आपण अक्रोड आणि बदामचा वापर करणार आहोत. जे तुपाची आवशक्यता पूर्ण करतील. या दोघात ही ओमेगा -३ फॅटी ऍसिड भरपूर आहेत. एक कप अक्रोड आणि बदाम ओव्हन मध्ये सुमारे ५ मिनिटे ३५० f तापमानावर भाजून घ्या. जळू देऊ नका नाहीतर कडू लागतील. अक्रोड आणि बदाम दोघांनाही वेगवेगळे भाजून घ्या. पॅन मध्ये भाजेले तरी चालतील. थोडे गरम असतानाच ग्राइंड करून घ्या.

ही बातमी पण वाचा : बनवा हिरवट पोपटी रंगाचे दुधीचे लाडू

साखरेऐवजी आपण ओले खजूर आणि मध वापरणार आहोत. जे साखरेची आवशक्यता पूर्ण करतील. पाण्याचा वापर न करता, खजूर ग्रँड करून घ्या. खजुरांना अगदी बारीक आणि सॉफ्ट पेस्ट होई प्रयन्त ग्राइंड करून घ्या. ह्या साठी फूड प्रोसेसर उत्तम आहे. मिक्सर मध्ये जरा कठीण जात, म्हणून खजुरांना चे बारीक तुकडें करा आणि मिक्सर मध्ये बारीक करतांना तुमच्या अंदाजानुसार मध टाका, पिसण्या साठी सोपे जाईल. आता सर्व साहित्य एका बाउल मध्ये चांगले मिक्स करून घ्या किंवा तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये ही सर्व साहित्य मिक्स करू शकता. त्यानंतर, वेलची पावडर, जायफळ पावडर, मीठ घालावे, किशमिश / भोपडा बियाणे / टरबूज बियाणे हे सर्व टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण अगदी भाकरी च्या ओल्या पिठाप्रमाणे व्हायला हवं. मिश्रण कोरडं वाटत असल्या किंवा, लाडू बांधायला अवघड होत असेल तर मध घालून मिळवून घ्या. तुमच्या गोड स्वादानुसार तुम्ही मधाचा वापर करू शकता. आता झाले तुमचे मिश्रण तयार, हवे त्या आकाराचे लाडू बनून घ्या. लाडूची चव दुसऱ्या दिवशी उत्तम असते. कारण सर्व पदार्थ मुरलेले असतात.

ही बातमी पण वाचा : खास नातेवाईकांसाठी बनवा’ ‘बाॅम्बे हलवा’ मिठाई..