झणझणीत ठेचा घातलेले वांग्याचा भरीत

vangyacha bharit

हुळहुळी थंडी मध्ये झणझणीत वांग्याचं भरीत हे व्हायलाच पाहिजे. म्हणून आज आम्ही घेऊन आलोय वांग्याचं भरीतची रेसिपी. आता तुम्ही म्हणाल की वांग्याचं भरीत तर आम्हला ही करता येतो. पण आम्ही तुम्हाला थोडी वेगळी रेसिपी सांगणार आहोत. या वांग्याच्या भरीत मध्ये आम्ही उपयोग करणार आहोत झणझणीत ठेच्याची.होय…मघ वाट कसली पाहताय..पटकन लिहून घ्या रेसिपी….

साहित्य :- वांग्याचा भरीत

  • १ मोठा भरीत वांगा भाजलेला
  • अर्धा वाटी लसून पाकळी
  • ५-६ हिरवी मिर्ची
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ वाटी बारीक चीरलेल कांदा
  • तेल
  • हळद
  • मिठ, जीर, लिंबू रस

कृती :- सर्वात आधी ठेच्यासाठी एक पॅन घ्यावे. त्यात थोड तेल घ्यावे व तापायला ठेवावे. मघ त्यात लसून पाकळी, हिरवी मिर्ची टाकून १-२ मिनिटे परतून घ्यावी. नंतर जीर आणि चिरलेली कोथिंबीर घालून परत थोड परतून घ्यावी. आता या मिश्रणामध्ये लीम्बुचा रस टाकावे व मिक्शर मधुन जाडसर काढून टाकावे. आता परत पॅन मध्ये तेल तापायला ठेवावे. त्यात चीरलेले कांदे गुलाबी रंगाचा होई पर्यंत परतून घ्यावे. तोपर्यंत भाजलेले वांग्याचा सालपट काढून त्याला मॅॅश करून घ्यावे. आता परतून झालेल्या कांद्यामध्ये हळद, मिठ आणि ठेचा घालावे व एक मिनिटासाठी परतून घ्यावे. आता या मध्ये मॅॅश वांगा घालून २ मिनिटे परतून घ्यावे. ठेचा घालून वांग्याचं भरीत तयार.

ही बातमी पण वाचा : पौष्टिक अशी अंड्याची भजी