हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी असे तयार करा सुंठीचे लाडू

sunthiche ladoo

वर्षभरातला हिवाळा हा असा ऋतू आहे जो प्रत्येकाला हवा हवा सा वाटतो. हिवाळ्यात पचन क्रिया उत्तम रित्या काम करीत असल्याने आणि वातावरणात गारवा असल्याने अनेक आरोग्यासाठी ही हा ऋतू तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे आरोग्यासाठी लाभदायक असलेले स्वादिष्ट सुंठीचे लाडू तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकाल याची रेसिपी आज आपण पाहूया

साहित्य : सुंठीचे लाडू

  • एक छोटी वाटी सुंठाची पावडर
  • 250 ग्रॅम काळा गुळ
  • 100 ग्रॅम मेथीचे दाणे
  • 25 ग्रॅम डिंक
  • 25 ग्रॅम मखाने
  • 200 ग्रॅम बारिक तुकडे केलेले ड्रायफ्रुट्स
  • 500 मिनी लीटर तूप
  • 3 चमचे खसखस
  • 200 ग्रॅम खोबऱ्याचा किस
  • एक वाटी मनुके

कृती : एका कढईमध्ये तूप घेवून ते गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्या. मध्यम आचेवर तळून घ्या त्यामुळे डिंक व्यवस्थित तळण्यास मदत होईल. तळलेला डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्या. डिंक तळून झाल्यानंतर मखाने तळून एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स गुळामध्ये मिक्स करा. खोबऱ्याचा किस, खसखस कढईमध्ये वेगवेगळी भाजून प्लेटमध्ये काढून घ्या. कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये मनुके टाकून थोडेशे तळून घ्या. डिंक आणि मखाने हातानेच कुस्करून घ्या. सर्व गोष्टी एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. तूप थोडं गरम करून त्या मिश्रणामध्ये एकत्र करा. तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या. तयार लाडू एका डब्ब्यामध्ये भरून ठेवा. आरोग्यदायी सुंठाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

ही बातमी पण वाचा : खास नातेवाईकांसाठी बनवा’ ‘बाॅम्बे हलवा’ मिठाई..

ही बातमी पण वाचा : सणासुदीच्या दिवसात बनवा पौष्टिक गव्हाच्या पीठाचे लाडू