या दिवाळीला घरीच बनवा ‘काजू कतली’

kaju katli

काजू कतली घरी बनविणे एकदम सोपे आहे. वेळ पण फारसा लागत नाही. सर्व साहित्य तयार असेल तर फक्त दहा मिनिटे लागतात. तर कशाला भेसळयुक्त बाजारी काजूकतली आणायची ? कशी करायची ते पहा….

साहीत्य :- काजू कतली

  • काजू १कप
  • मिल्क पावडर १/४कप
  • साखर ३/४ कप
  • पाणी १/४ कप +२ टीस्पून
  • तूप १ टीस्पून
  • वेलचीपूड ऐच्छीक
  • चांदी वर्ख ऐच्छिक

कृती :- प्रथम काजूची मिक्सर मधून पावडर करून घ्यावी. नंतर बाऊलमधे काढून मिल्क पावडर त्यामधे मिसळून घ्यावी. नंतर साखरेमधे पाणी घालून एकतारी पाक करावा. साधारणपणे ४ ते ५ मिनिटात पाक होतो. आता तयार पाकामधे काजू पावडर व वेलचीपूड घालून गोळा होइपर्यंत हलवत रहावे. ती कढईपासून मिश्रण सुटत येते. होत आल्यावर शेवटी तूप घालावे. तयार मिश्रणाचा गोळा  ताटामधे काढावा व साधारण गरम असतानाच मळून पोळपाटावर तूपाचा हात लावून जाडसर पोळी लाटावी. थंड झाले की चाकूने रेषा पाडाव्यात व वड्या काढाव्यात. अशी काजू कतली आठ दिवस आरामात टिकते. गावी जाताना करून नेंण्यास किंवा काही कार्यक्रम असेल तर आधीच करून ठेवता येते.

ही बातमी पण वाचा :  या दिवाळीला बनवा मस्त खुसखुशीत पालकाचे शंकरपाळे

टीप्स :

  • काजू पावङर मिक्सर चालू-बंद करत करावी. नाहीतर तेल सुटते.
  • काजू पावङर चाळून घ्यावी.
  • गोळा तयार करताना फार मळू नये, तूप सुटते.