जिभेवर रेंगाळणारा खमंग बेळगावी कुंदा

belgaum-kunda

बेळगावी कुंदा हा पदार्थ खाल्लाय का?? या पदार्थाबद्दल नुसते सांगून उपयोग नाही, कारण हा पदार्थ हा निव्वळ अनुभव घ्यायचाच पदार्थ आहे. अतिशय खमंग असलेला हा पदार्थ बेळगाव, शहापूर या ठिकाणी खूप प्रचलित आहे. शिवाय कोल्हापूर मध्ये देखील सहज मिळतो हा पदार्थ. याचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे तो गरमच खातात. थंड झालेला असला तरी खाताना गरम करून घेतात.

साहीत्य :- belgaum kunda recipe

  • साखर अर्धा वाटी
  • डिंक १ टेस्पून
  • रवा १ टेस्पून
  • तूप १ टेस्पून
  • दही १ टेस्पून
  • दूध १/२ लिटर
  • जायफळ, वेलची पावडर आवडीनुसार

कृती :- प्रथम साखर कँरेमल करायला एका पॅनमधे घालून बारीक गँसवर ठेवा. आता कँरेमल तयार होईपर्यंत तूपामधे डिंक फुलवून घ्या. नंतर राहीलेल्या तूपामधे रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. त्यामधे तळलेला डिंक घाला, त्यातच कच्चे दूधही घाला. दूध उकळू द्या, उकळत असताना दही घाला. दूधाला हलवत रहा. दूध फाटेल. शेवटी तयार झालेले कँरेमल उकळत्या दूधामधे घाला व व्यवस्थित ढवळा. ढवळून जवळपास अर्धा तास उकळत राहू द्या. अर्ध्या तासाने घट्ट गोळा तयार होतो. जायफळ, वेलची घाला व एका खोलगट बाऊलमधे काढा. थंड  होऊ द्या. अगदी विकतच्या सारखा तांबूस रंगाचा मस्त कुंदा तयार. तयार कुंद्यावर चांदीचा वर्ख आवडत असेल तर लावा व खायला द्या. खूप सोपा व कमी साहीत्यात तयार होतो. तूम्हीही करून बघा. तूम्हाला नक्की आवडेल.

ही बातमी पण वाचा : खास नातेवाईकांसाठी बनवा’ ‘बाॅम्बे हलवा’ मिठाई..

ही बातमी पण वाचा : कुरकुरीत मस्त ‘नानखटाई’…