यंदाच्या दिवाळीत बनवा ‘बदामी पुरी’

badam-puri

दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. पण यंदाच्या दिवाळीत ‘बदामी पुरी’ बनवून  दिवाळीची रंगत वाढवा.

साहित्य : badam-puri-recipe

  • एक कप पीठ
  • एक कप बदाम भिजवून, सोलून, सालं काढलेले
  • पाव कप गूळ
  • एक चमचा वेलची पूड
  • दूध अर्धा कप (आवडत असल्यास थोडे जास्त )
  • पाव कप मध
  • २ चमचे काजू, बदामाचे काप, केशर

कृती :- ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर सेट करावा. (प्री-हीट). बदामाची मिक्‍सरवर पूड करावी. एका बाऊलमध्ये पीठ, बदाम पावडर, गूळ, वेलची, केशर सगळे एकत्र करावे. दुधाचा वापर करत हे पीठ वरील सर्व जिन्नस एकत्र करून मळावेत. या पिठाचे लहान आकाराचे गोळे करत त्यांची पुरी लाटावी. पुरीचा अर्ध त्रिकोणी भाग करून, पुऱ्या तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवाव्यात. पुऱ्या लाटून झाल्या, की या पुऱ्या ओव्हनमध्ये १० ते १२ मिनिटे बेक कराव्यात. बेकिंग झाले, की त्यावर हलकेसे मधाचे थेंब शिंपडावे. त्यावर कापलेले ड्रायफ्रूट सजावटीसाठी मांडावेत. तुमची बदामी पुरी रेडी..

ही बातमी पण वाचा : झटपट बनवा ब्रेड क्रम्ब्स खीर…