तर दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल, अजित दादांचा राज ठाकरेंना टोला

Ajit Pawar- Raj Thackeray

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असताना सरकारकडून नेहमी लोकांना मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंग पाळा, लॉकडाऊन टाळा अशा सूचना देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टोला लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मंत्रिमंडळातील ७-८ सदस्यांना कोरोना झाला आणि निघूनही गेला. काही आमदारांनाही कोरोना झाला, फक्त मुख्यमंत्री, प्रविण दरेकर आणि सभापतींना कोरोना झाला नाही, मला कोरोना झाला, देवेंद्र फडणवीसांनाही कोरोना झाला, तुमची रोग प्रतिकारकशक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून कोरोना झाला नसावा काय असेल माहिती नाही. कोरोना होऊ नये अशी इच्छा आहे, त्यामुळे उद्या समजा कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल असा चिमटा अजितदादांनी राज ठाकरे यांच्यावर काढला.

त्याचसोबत राज्यावरचं कोरोनाचं संकटअजूनही टळलं नाही. अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, अमरावती, अकोला, पुणे, अशा विविध भागात कोरोना वाढत आहे, प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांसाठी बैठका सुरू आहेत, सगळ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजे. काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, पण दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय…एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER