बंडखोरांनी केले शेवटच्या दिवशी अर्ज दाखल

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी औंरगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघात बंडखोरांनी शुक्रवारी अर्ज दाखल कले. यामुळे भाजप शिवसेना आणि एमआयएमच्या अधिकृत उमेदवारांची डोके दुखी वाढली आहे.

मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवरांनी गुरूवारीच अर्ज दाखल केल्याने अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाकडे राजकीय धरिणांचे लक्ष होते. औरंागाबाद पूर्व मधून भाजपकडून अतुल सावे, पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट आणि औरंगाबाद मध्यमधून एमआयएमच्या अधिकृत उमेद्वारांविरोधात बंडखोरी पहायला मिळाली आहे.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या विरोधात जावेद कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे उमेदवार प्रदिप जयस्वाल यांच्या विरोधात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी अर्ज दाखल केला. पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी अर्ज भरला. पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमच्या विरोधात कॉँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम भैय्या पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी कायम राहीली तर बहुरंगी लढती होऊन वेगळाच निकाल लागू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.