दिलासादायक बातमी, राज्यात आज दिवसभरात ५२ हजार ४१२ रूग्ण कोरोनामुक्त

Coronavirus Maharashtra

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील (Lockdown) निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. राज्यात आज दिवसभरात ५२ हजार ४१२ रूग्ण करोनामुक्त झाले आहे. तर दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज ५२ हजार ४१२ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button